रंग रंगाओ, इक्रो फ्रेण्डली

होळी आणि रंगपंचमी हे उत्साहाचे, आनंदाचे सण कारण वसंताचे आगमन होत असतांना त्याचे स्वागत करण्यासाठी हे साजरे केले जातातया वसंत उत्सवात झाडांना बहर येतो. या काळात विविध फुलांच्या रंगांनी तसेच सुगंधानी आसमंत बहरलेला असतो. अशा सुवासिक वातावरणात कृत्रिम रंगाची रंगपंचमी खेळत गेली. बरीच वर्षे आनंद व्यक्त करण्याची प्रथा आहे परंतु या कृत्रिम रंगात विषारी पदार्थ असल्यामुळे शरीराला मोठे अपाय होतात. त्वचेचे आजार बळावतातकधी कधी तर हा आनंद जीवावर बेतण्याची देखील भिती असते. त्यामुळे "खेलो होली इक्रो फ्रेण्डली" अर्थात पर्यावरण पूरक नैसर्गिक सुगंधित रंगाचा वापर करून रंगपंचमी खेळा अशी संकल्पना बऱ्यापैकी जोर धरू लाकगली आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक रंगाकडे रहिवाशांचा ओढादेखील मोठा आहे. परंतु हव्या त्या प्रमाणात नैसर्गिक रंगाची उपलब्धता नसल्यामुळे या चांगल्या संकल्पनेलादेखील काही मर्यादा आल्या आहेत. मात्र उपलब्ध साधनाच्या मदतीने घराघरात नैसर्गिक रंग तयार केले जावेत आणि त्याच नैसर्गिक रंगाने होळी सण साजरा केला जावा म्हणजे रंगाचा बेरंग होणार नाही.


__ पुरातन काळात पारंपारिकरित्या झाडांची फुले, पाने, बिया यांच्यापासून नैसर्गिक, सुगंधित आणि शरीराला बाधा पोहोचणार नाहीत असे रंग तयारकरून होळी साजरी करण्याची प्रथा होती. मात्र अलीकडच्या काळात कृत्रिम रंग वापरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दुष्परिणाम वाढले. या कृत्रिम रंगामध्ये विषारी रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात येत असल्यामळे शरीराला आपण होण्याचे प्रमाण वाढले. कृत्रिम रंगापैकी काळ्या रंगात ऑक्साईड हे रसायन असल्यामुळे मुत्रसंस्थेचे कार्य बंद पडण्याचा धोकाहिरव्या रंगात कॉपर सल्फेड असते. त्यामुळे डोळ्यांना धोका, चांदसर रंगात अॅल्युमिनिअम ब्रोमाईड असते. त्यामुळे कॅन्सर, निळ्या रंगात प्रशियन निळ, त्यामुळे त्वचेचे आजार, तर लाल या सर्वाधिक उपयोगात आणल्या जाणाऱ्या रंगात मयुरी सल्फाईट असते हे अत्यंत विषारी असल्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. हे वेळोवेळी उघड झाले असल्यामुळे राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा प्रकारच्या कृत्रिम रंगाऐवजी नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन केले जाते. राज्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातन शाळा पातळीवर राष्ट्रीय हरित सेना ही चळवळ राबवण्यात येत असतेविद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरीकडे ज्या परिसरात नैसर्गिक फुले, पाने, बिया उपलब्ध आहेत. त्याठिकाणी हे रंग तयार करण्यात अडचणी नाहीतमात्र शहरी परिसरात यासाठी बऱ्याच मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे घरच्या घरी अगदी शहरातदेखील डाळींबाच्या साली, रक्तचंदन, बिटाचे तुकडे, टोमॅटो, लाल गाजराचे तुकडे, पालक, कोथिंबीर, पुदीना, मेहंदीचंदनाची पावडर, झेंडूची फुले आदींचा उपयोग करून विविध प्रकारचे रंग तयार येऊ शकतात.होळी आणि रंगपंचमी हे आनंदाचे सण मात्र कृत्रिम रंगाचा वापर करून या आनंदाच्यच सणाचा देखील आपण बेरंग करतो. त्यामुळे प्रत्येकाने नैसर्गिक सुगंधित रंगाचा वापर करून होळी साजरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.