प्रचारात आघाडी घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांचा नामी तोडगा
बदलापूर नगर परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यामळे यंदाची नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी इच्छक असलेल्या उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रभागामध्ये जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यात आहे. या इच्छुकांमध्यो विविध राजकीय पक्षांमध्ये सक्रीय असलेल्या पदाधिकारी, कार्यकत्यांसह नवोदितांचाही समावेश आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी कशी मिळेल? यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत.तर नवोदितांनी कोणत्या राजकीय पक्षाककडून उमेदवारी मिळू शकेल? कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभागात चांगला जनाधार आहे? याचा अभ्यास करून त्या पक्षाकडन उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर काही नवोदितांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवार म्हणून नशीन नशीब आजमावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे निवडणूक जस जशी जवळ येईल तस तसे अनेक नवे चेहरे राजकीय वर्तुळात चर्चेत येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली असली तरी अद्याप प्रभाग आरक्षणे जाहीर झालेली नसल्याने इच्छूक उमेदवारांचे टेन्शन कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार की बहसदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार याविषयी नवे नवे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या तयारीचा एक भाग म्हणून नगरपरिषदेच्या क्षेत्रातील सन २०११ च्या जनगणनेनुसार असलेली लोकसंख्या ,प्रभाग,सदस्य संख्या, अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, नकाशे आदी बाबतची माहिती मागविण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेत ५७ तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेत ४७सदस्य निवडून जाणार असल्याचे कोकण विभागीय आयक्तांकडून नगर परिषदेला प्राप्त झालेल्या पत्राद्वारे स्पष्ट झाले होते. तसेच आरक्षित प्रभागांची संख्याही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार असल्याचे गृहित धरुन इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. असे असतानाच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने अंबरनाथ व बदलापूरसह राज्यातील आठ नगर परिषदा व केज नगर पंचायतीच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे आगामी निवडणूक एक सदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार याविषयी इच्छुक उमेदवारांसह सर्वसामान्यही संभ्रमात पडले होते. मात्र अलिकडेच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आगामी सावत्रत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पध्दतीने घेण्याबाबत निर्नय घेण्यात आला. तसेच यासंदर्भात अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.त्यानंतर काही दिवसातच निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे आता ही निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पध्दतीनेच होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र प्रभाग आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसल्याने जोरदार तयारी करुन निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या उमेदवारांचे टेन्शन अद्यापही कायम आहे. ज्या सोयीस्कर वाटणाऱ्या प्रभागात आपण निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहोत; त्या प्रभागात आरक्षण बदलामुळे आपल्याला निवडणूक लढवता आली नाही तर काय करायचे? असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
त्यामुळे सध्या बदलापूरातील अनेक इच्छुक व राजकीय दिग्गज आरक्षणाचे निकष व मागील निवडणुकीतील प्रभागांचे जाहीर झालेले आरक्षण याचा अभ्यास करुन कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडू शकेल याचे अंदाज बांधत आहेत. त्यानुसार आवश्यकता भासत असल्यास पर्यायी प्रभागांचा विचार करुन त्याठिकाणी मोर्चेबांधणी केली जात आहे. काहींनी प्रभाग आरक्षण जाहीर होईपर्यंत शांत राहुन प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. काहींनी मात्र आरक्षण जाहीर होण्याची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात सुरु केला आहे.निवडणुकीच्या प्रचाराला जोर आल्यानंतर सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. त्यात वेळ कमी पडल्यास सर्व मतदारांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. आधीपासूनच प्रचाराला सुरुवात झाल्यास जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचून प्रचारात आघाडी घेता यावी, असा या मंडळींचा प्रयत्न आहे. त्यासाठी युक्तिही नामी शोधण्यात आली आहे. ती म्हणजे कुटुंबातील महिला व पुरुषांनी दोघांनीही निवडणूक लढविण्याची तयारी करण्याची. प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यास महिलांनी उमेदवारी घ्यायची आणी प्रभाग पुरुषांसाठी आरक्षित झाल्यास पुरुषांनी उमेदवारी घ्यायची. अशाप्रकारे निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांच्या कुटुंबातील आई-मुलगा, भाऊ-बहिण व पती-पत्नी तयारीला लागले आहेत. अर्थात त्यामध्ये पती-पत्नींची संख्या सर्वाधिक असून राजकीय दिग्गजच नव्हे तर नवोदितही अशाप्रकारे तयारीला लागले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागात उमेदवार कोण? तर श्री किंवा सौ असे चित्र सध्यातरी दिसत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात प्रभाग आरक्षण जाहीर होईल. त्यानंतरनिवडणुकीच्या मैदानात श्री उतरणार की सौ याबाबतचे चित्र स्पष्ट होईलच. तोपर्यंत हेचित्र कायम राहणार आहे.